Home नाशिक सिन्नर: ट्रेलरखाली दबून दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

सिन्नर: ट्रेलरखाली दबून दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

Sinner: घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर ट्रेलर उलटून त्याखाली दुचाकी दाबून झालेल्या अपघातात(Accident) तालुक्यातील सोनांबे येथील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना.

death of Mileka on a two-wheeler by being crushed under a trailer Accident 

सिन्नर:  घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर ट्रेलर उलटून त्याखाली दुचाकी दाबून झालेल्या अपघातात तालुक्यातील सोनांबे येथील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनांबे येथील मायलेक सिन्नरहून घरी परतले नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांचे मोबाईल लोकेशन केल्यावर ते वळणावर उलटलेल्या  ट्रेलर खाली दाबले गेल्याची बाब समोर आली. अपघातानंतर फरार झाल्याने प्रारंभी केवळ ट्रेलर उलटला असल्याचे आणि त्यात कुठलीही जीवित हानी नसल्याची माहिती पोलिसांपर्यंत होती. शुक्रवारी पहाटे ४ वाजता त्यांचे मृतदेह ट्रेलर खालून बाहेर काढले.

या अपघातात बिलकिस हमीद शेख (३४) आणि आरमान हमीद शेख (१९) अशी  ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत. हे दोघे आपली दुचाकी (एमएच-१५, बीएफ -४९१९) वरून गुरुवारी दुपारी सिन्नर येथे बाजारासाठी आले होते. घरी परतताना त्यांनी कुटुंबीयांना सिन्नरून निघाल्याचे मोबाईल वरून सांगितले होते. मात्र ते घरी न पोहोचल्याने घटना उघडकीस आली आहे.

Web Title: death of Mileka on a two-wheeler by being crushed under a trailer Accident 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here