Home क्राईम लाच मागितली, सहकार अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

लाच मागितली, सहकार अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

Nashik Crime:  एकूण दीड लाख रुपयांची लाच (Bribe) देण्याची मागणी.

Demanding bribe, crime against co-operative officer

नाशिक: एक लाखाची लाच मागितल्याचे पंचासमक्ष सिद्ध झाल्याने निफाड सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संशयित राजेश ढवळे याच्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तक्रारदाराच्या अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी ढवळे यांनी त्यांच्याकडे एकूण दीड लाख रुपयांची लाच देण्याची मागणी ६ सप्टेंबर २०१३ रोजी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी या तक्रार अर्जाची पडताळणी करून खात्री करण्याचे आदेश दिले. यानुसार पंचांसमक्ष लाच मागणीसंदर्भात पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.

तडजोडीअंती ढवळे यांनी १ लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Demanding bribe, crime against co-operative officer

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here