संगमनेरातील नायब तहसीलदारास करोनाची लागण
Coronavirus/ संगमनेर: आता नवीनच वृत्त आले आहे की, संगमनेर शहरातील एका नायब तहसीलदारास करोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांत ते पुणे येथे जाऊन आले होते. पुणे येथून ते करोना घेऊन संगमनेरला आले आहे.
काल रविवारी त्यांना श्वसनाचा अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी एका खासगी रुग्णालयात आपली करोनाची तपासणी केली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
Website Title: Deputy Tehsildar of Sangamner Coronavirus infected