Home संगमनेर संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना पाहावत नाही, महसूलमंत्री विखे यांच्यावर निशाणा

संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना पाहावत नाही, महसूलमंत्री विखे यांच्यावर निशाणा

Sangamner: संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

development of Sangamner taluka, revenue minister Vikhe is targeted

संगमनेर: सततच्या विकासकामातून आणि सुसंस्कृत राजकारणातून संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना पाहावत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. ते मंत्री राज्याचे आहेत की, दोन-तीन आहे. तालुक्यांचे आहेत. हेच कळत नाही. सत्ता येते आणि जाते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एका दिवसात सर्व चित्र बदलेल, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि. २४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव खेमनर, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केले. सीताराम राऊत, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, रामदास वाघ, मिलिंद कानवडे, नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, पद्मा थोरात, संपत गोडगे आदी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, आपण सर्वांना बरोबर घेत तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखली

विकासकामातील सातत्य, सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे राज्यात संगमनेर तालुका आदर्शवत ठरला आहे. मात्र, हा संगमनेरचा विकास काहींना पाहावत नसल्याने त्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून, अशा काळात सर्वांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी संगमनेर तालुक्याची विकासाची वाटचाल सुरूच राहणार आहे. गावाच्या व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहन देखील त्यांनी स्वागत व प्रास्ताविक संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती नवनाथ आरगडे यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

भारत जोडो अभियान यात्रा राज्यात आपण यशस्वी केली. आहे. अडचणीचा काळ लवकरच संपणार असून, आपल्या तालुक्याची यशस्वी वाटचाल सर्वांच्या साथीने पुढे घेऊन जाऊ, असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: development of Sangamner taluka, revenue minister Vikhe is targeted

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here