Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?  दोन्ही नेत्यांनी दिले संकेत!

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?  दोन्ही नेत्यांनी दिले संकेत!

फडणवीस आणि ठाकरे यांनी अचानक एकमेकांबाबत सूचक विधानं केल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. Devendra Fadnavis and Uddhav Thackeray

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray will reunite

Devendra Phadavanis Speech: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनी पहिला आहे. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. आधी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हीच वेळ आली. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष आणखीच पेटला आहे. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हं दिसून येत आहे.

कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांबाबत अशी काही सूचक विधानं केली आहे, की ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे फडणवीस आणि ठाकरे यांनी अचानक एकमेकांबाबत सूचक विधानं केल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहे आणि ते आजही आहे. आमच्या मनात कधीही कटुता नाही. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही’ असं वक्तव्य माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले अगदी खालच्या थराला जावून आरोप करण्यात आले. कधीही माझ्या तोंडातून याबद्दल कधीही अशी विधानं आली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रू नसून आम्ही वैचारिक विरोधक झालोय, कारण ठाकरे यांनी दुसरा विचार पकडलाय. त्यामुळे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय ते योग्य नाही. ते कधीतरी संपवावे लागेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Web Title: Devendra Fadnavis and Uddhav Thackeray will reunite

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here