Home अहमदनगर दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका, कोपरगाव तालुक्यातील भाविकाचा मृत्यू

दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका, कोपरगाव तालुक्यातील भाविकाचा मृत्यू

अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

devotee from Kopargaon taluk died of a heart attack while waiting in line for darshan

कोल्हापूर: दक्षिण भारताची सहल करून परतणाऱ्या अहमदनगर येथील भाविकाला बुधवारी सकाळी अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामनाथ गबाजी जाधव ( वय ६२, रा. मोर्विस, पो. चास नळी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर ) असे मृताचे नाव आहे.

रामनाथ जाधव हे अन्य चार मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर निघाले होते. दक्षिण भारत फिरून ते बुधवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचले. अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेत गेल्यानंतर काही वेळाने अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. रांगेतच कोसळल्याने त्यांना देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जाधव हे शेतकरी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी दिली.

Web Title: devotee from Kopargaon taluk died of a heart attack while waiting in line for darshan

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here