Home औरंगाबाद संचालकाने  ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

संचालकाने  ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

Breaking News | Crime: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला होता. मात्र, अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीने वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन, ‘तू काळी आहेस,’ असे म्हणत अकॅडमीच्या संचालकाने हिणवले होते. हा अपमान सहन न झाल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गरुडझेप अकॅडमीच्या संचालकासह एकूण पाच लोकांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. 

लीना पाटील (वय 19 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.  लीना पाटीलच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  तक्रारीत म्हटले आहे की, “पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटीलने दीड वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. ज्यासाठी त्यांनी तीन टप्प्यात एकूण 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. तसेच मेससाठी 4500 प्रती महिना भरत होते. कधीकधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनावणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडीलांना फोन करून सांगायची. तसेच जेवण देखील दिले जात नव्हते. मात्र, निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे,” असे तक्रारीत म्हटले आहे.

मेसच्या पैश्यासाठी गरुडझेप अकॅडमीचा संचालक निलेश सोनवणे सतत लीनासह इतर मुलींचा देखील अपमान करायचा. अनेकदा नाश्ता आणि जेवण न देता अपमान करायचा. विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर ‘ये काळे’  म्हणून हाक मारायचा. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचा नीलाने एकदा थेट निलेश सोनवणेला सांगितले होते. त्यावर, ये काळे तू मला शिकवू नको, इतकं माय बापाचं वाटते तर जीव दे, तुझी लायकी तरी आहे का नोकरीवर लागायची, मी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचे ते कर, असे निलेश सोनवणे म्हणाला होता, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Suicide Case Director says ‘You are black’, young woman ends life

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here