Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवासी व चासनळीचे व्यावसायिक अल्लाउद्दीन खाटीक यांचा मृतदेह (Dead Body) नगर-नाशिकच्या सर हद्दीलगत देवगाव शिवारात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अल्लाउद्दीन खाटीक चासनळी येथे बोकडाचा व्यवसाय करतात बोकड खरेदी निमित्त सायखेडा येथून येत असताना देवगाव-कानळद रस्त्यावर देवगाव शिवारात पडीत जमिनीमध्ये त्यांची मोटारसायकल व त्यांचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. नातेवाईकांच्या चौकशीअंती त्यांच्याकडे दहा-बारा लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे समजते. अल्लाउद्दीन खाटीक यांनी राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे उप अध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आहे.
Web Title: discovery of the businessman’s Dead body