Home पुणे चार वर्षीय मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

चार वर्षीय मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Pune: लहान मुलीचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह (Dead body) छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आला.

dismembered Dead body of a four-year-old girl was found

पुणे: मेदनकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत घराच्या मागील बाजूस एका चारवर्षीय चिमुकलीचा विवस्त्र छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह (Dead body) गुरुवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी मुलगी बेपत्ता असल्याची तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली होती.

नेहा सत्येंद्रकुमार ठाकूर (२७, सध्या रा. भागवत वस्ती, मेदनकरवाडी, ता.खेड. मूळ रा. भोजापूर, ता. भैरिया, जि. बलिया, उत्तर प्रदेश) यांनी पोलिस फिर्याद दिली की, ‘१० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेदरम्यान दोघी बहिणी घरात झोपलेल्या असताना रिशू (४ वर्षे ४ महिने) ही चिमुकली कुणाला काहीएक न सांगता घराबाहेर पडली. काही वेळानंतर तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. म्हणून चाकण पोलिसांत बुधवारी अज्ञाताने रिशूचे अपहरण केल्याची तक्रार केली होती. गुरुवारी सकाळी कंपनीत कामावर जाणाऱ्या लोकांना एका लहान मुलीचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आला. नागरिकांनी ही माहिती चाकण पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

Web Title: dismembered Dead body of a four-year-old girl was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here