Home मुंबई दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

Doordarshan Anchor Pradeep Bhide Passes Away

Doordarshan Anchor Pradeep Bhide Passes Away: दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज आज हरपला आहे. दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. . ते ६५ वर्षांचे होते.  

मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलंत्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे बातम्यांची ओळख व घराघरात पोहोचले आहे.

ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनाबाबत माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Doordarshan Anchor Pradeep Bhide Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here