Home अकोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला-...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला- हिरालाल पगडाल

Rajur: परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य 

Dr. Babasaheb Ambedkar successfully fought Hiralal Pagdal

राजूर: महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना जगभरातून अभिवादन केले जात आहे. राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले.

या कार्यक्रमप्रसंगी माजी प्राचार्य हिरालाल पगडाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पगडाल यांनी विद्यार्थांना संबोधित केले. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

‘आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात,’ असे हिरालाल पगडाल म्हणाले आहेत. तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच. तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत,’ अशी इच्छा हिरालाल पगडाल यांनी व्यक्त केली.

बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नित्व यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते,’ असेही हिरालाल पगडाल म्हणाले.

‘बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा, नारायण लोखंडे यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली,’ असे हिरालाल पगडाल म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ज्ञ, राज्यशास्त्रज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम,’ असे म्हणत पगडाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या. तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’, असा संदेश त्यांनी जनतेला दिला. जात पात लोकांच्या मनातून नष्ट व्हायला पाहिजे असे प्रतिपादन हिरालाल पगडाल यांनी केले.

यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार, उप प्राचार्य बी.एन. ताजणे व सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संतोष कोटकर, सुधीर आहेर यांनी केले होते. सूत्रसंचालन सौ. बिना सावंत यांनी केले. प्रास्ताविक शरद तूपविहीरे यांनी केले तर आभार उप प्राचार्य बी.एन. ताजणे यांनी मानले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar successfully fought Hiralal Pagdal

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here