Home अहमदनगर मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकास मारहाण व लुटले

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकास मारहाण व लुटले

a driver of the Chief Minister's secretary was robbed and beaten

अहमदनगर | Ahmednagar: नगर पुणे रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकास चोरट्यांनी बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांचे वाहनचालक अरुण घुले हे सरकारी वाहन घेऊन बीड येथे गेले होते. तेथील काम आटोपून पुन्हा मुंबईकडे जात असताना झोप लागली म्हणून नगर पुणे रोडवरील सुपा परिसरातील एका पेट्रोल पंपावर थांबले. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी वाहनातून बाहेर काढून मारहाण करत रोख रक्कम व सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी चालक अरुण घुले यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिव यांच्या चालकालाच लुटल्याने चोरट्यांना कोणताही धाकच राहिलेला नाही असे दिसून येत आहे.  

Web Title: a driver of the Chief Minister’s secretary was robbed and beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here