Home अहमदनगर संगमनेर: डीजे वाहन चालकाने वराती मंडळीलाच चिरडले, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

संगमनेर: डीजे वाहन चालकाने वराती मंडळीलाच चिरडले, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

Breaking News | Sangamner: डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले.

driver of the DJ vehicle crushed the congregation, killing two and injuring three

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दुर्दैवी घटना घडली आहे. नवरदेव लग्नासाठी धामधूम वरातीत निघाला असताना बेधुंद झालेल्या डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना आज दिनांक ४ जानेवारी गुरुवारी  सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या मंगलमयी प्रसंगी गावावर शोककळा पसरली आहे.

किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे लग्न रणखांब येथे पार पडणार होते. सर्व नातेवाईक वराडी मंडळी यावेळी उपस्थित होती. नवरदेवाची घरापासून मिरवणूक सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे.

नवरदेवाची पाठवणी सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. डीजे चालकाने अचानक वेग वाढविल्याने वराती मंडळी चाकाखाली चिरडली गेली.

Balasaheb Kahatl

या अपघातात बाळासाहेब हरिभाऊ खताळ वय २५ रा. धांदरफळ खुर्द, भास्कर राघू खताळ वय ३७ रा. धांदरफळ खुर्द यांचा मृत्यू झाला आहे. तर रामनाथ दशरथ काळे, अभिजित संतोष ठोंबरे, सोनाली बाळासाहेब खताळ अशा संजय खताळ हे जखमी झाले आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: driver of the DJ vehicle crushed the congregation, killing two and injuring three

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here