Home अकोले अकोलेतील एका नोकरदाराला सात लाखाला ऑनलाईन गंडा

अकोलेतील एका नोकरदाराला सात लाखाला ऑनलाईन गंडा

Ahmednagar Share Market Cheated: शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक.

an employee in Akole was cheated online for seven lakhs

अकोले: गुंतवणुकीचे विविध अमिष दाखवून नोकरदाराला ७ लाख १९ हजार ६४२ रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संतोष नारायण वाकचौरे (वय 44 रा. अकोले) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 2 डिसेंबर, 2021 ते 18 जानेवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी वाकचौरे यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर, 2022 रोजी फिर्याद दाखल केली आहे.

वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क केलेले अंशुसिंह, चरणसिंह, जयवर्धनसिंह, प्रविण बन्सल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला संतोष यांना अंशुसिंह याने दोन वेगवेगळ्या मोबाईलवरून संपर्क करून डिमॅट अकाउंटचा युझर आयडी, पासवर्ड घेतला. यानंतर चरणसिंह याने संतोष यांच्याशी संपर्क करून शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

जयवर्धनसिंह याने एका मोबाईलवरून संतोष सोबत संपर्क करून केदार फायनान्शियल सर्व्हिसेस लि. या कंपनीचा मॅनेजर बोलतो, असे सांगून सिंगापूर एक्सचेंजमधील गुंतवणूक केलेल्या रकमेचा नफा पाहिजे असल्यास फॉरेन्स करन्सी टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले. तसेच प्रविण बन्सल नामक व्यक्तीने संतोष यांच्यासोबत संपर्क करून डिमॅट अकाउंटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले. अशा पध्दतीने वरील व्यक्तींनी संतोष यांच्याशी संपर्क करून त्यांच्या खात्यातील सात लाख 19 हजार 642 रुपये ऑनलाईन काढून घेतले आहेत.  पुढील तपास निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

Web Title: an employee in Akole was cheated online for seven lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here