कंपनीत हातपाय बांधून कर्मचाऱ्याला डांबले, दोघांवर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: रात्री साडेआकरा वाजता प्लॉट १२ च्या तिसऱ्या मजल्यावर टेक्निकल असिस्टंटला दोन अनोळखी व्यक्तींनी हातपाय बांधून डांबून ठेवले. दोघांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा.
नगर: नागापूर एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीत बुधवारी (दि. ३) रोजी रात्री साडेआकरा वाजता प्लॉट १२ च्या तिसऱ्या मजल्यावर टेक्निकल असिस्टंटला दोन अनोळखी व्यक्तींनी हातपाय बांधून डांबून ठेवले. रात्री उशिरा हा प्रकार घडकीस आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक अंकुश जावळे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, गाडेकर चौक सावेडी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सनफार्मा कंपनीत टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करीत आहे.
बुधवारी रात्री तिसऱ्या शिप्टसाठी कंपनी गेलो असता प्लॉट १२ च्या तिसऱ्या मजल्यावर आवाज आला. त्यामुळे लोखंडी सीडीने तिसऱ्या मजल्यावर गेला असता दोन अनोळखी व्यक्ती तिथे दिसल्या. तुम्ही इतक्या रात्री इथे काय करता असे विचारले असता त्या दोघांनी काही न बोलता जावळे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या तोंडाला चिकट्पट्टी बांधून हातपाय बांधून डांबून ठेवले आणि तिथून निघून गेले. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: employee was arrested by tying his hands and feet in the company, a crime against both
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study