विनयभंग प्रकरणी शिक्षक बँकेचे माजी संचालक निलंबीत
Breaking News | Ahmednagar: शिक्षक बँकेचे माजी संचालक व माळीबाभुळगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्यावर निलंबणाची कारवाई जि. प. ची कारवाई.
करंजी: शिक्षक बँकेचे माजी संचालक व माळीबाभुळगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष अशोक अकोलकर यांच्यावर निलंबणाची कारवई करण्यात आली आहे.
त्यांच्या विरोधात शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गुरुवारी (दि.७) अकोलकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. पाथर्डी पोलिसात संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, १२ फेब्रुवारी रोजी घरच्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी पिडीत महिला शेतात गेले असता, त्या ठिकाणी संतोष अशोक अकोलकर आला. तुझ्या नवऱ्याने माझ्या पत्नी विरोधात अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्था व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे निवेदन देऊन माझ्या पत्नी विरोधात तक्रार केली. त्यामुळे माझ्या पत्नीची करंजी येथून बदली झाली असे म्हणत संबंधित महिलेला शिवीगाळ व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
म्हणुन संतोष अकोलकर यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Ex-director of Teacher’s Bank suspended in molestation case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study