Home अहमदनगर नदीवर एकटी असल्याचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग

नदीवर एकटी असल्याचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग

Excess on a woman taking advantage of being alone crime register

कोपरगाव | Crime: कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एक तरुणी महिला नदीवर धुणे धुण्यासाठी गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत विजय चंदू जिरे याने तिच्यावर दमदाटी करत छेडछाड केली तसेच तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपीविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार १४ मे रोजी गोदावरी नदी तीरावर धुणे धुण्यासाठी गेले असता एकटीला पाहून विजय जरे याने फिर्यादी महिलेअस दमदाटी करून बळजबरीने फिर्यादीचा हात धरून काटवनात नेले. त्याठिकाणी मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केला. याप्रकरणी आरोपी विजय झरे याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Excess on a woman taking advantage of being alone crime register

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here