Home अहमदनगर Dead Body: महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

Dead Body: महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

Excitement over finding woman's Dead body

राहुरी | Rahuri: राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर गुंजाळ नाका परिसरात सोळुंकी यांच्या पेट्रोल पंपासमोरील मळीच्या गटारात एका वयोवृद्ध महिलेचा (Dead Body) मृतदेह आढळून आला आहे. गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

नगर-मनमाड मार्गावरून एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना लघुशंकेसाठी थांबले असता मळीच्या गटारात एक वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांनी तातडीने सदर माहिती स्थानिक नगरसेवक आदिनाथ कराळे यांना दिली. कराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेहाबाबत माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नीरजकुमार बोकील पोलीस हॅडकॉन्स्टेबल डी. एन.गर्जे यांनी दाखल मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी साई प्रतिष्ठनचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने नेण्यात आला आहे.

सदर महिलेस रात्रीच्या वेळी जोराची धडक दिल्याने मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: Excitement over finding woman’s Dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here