साई संस्थान रुग्णालयातील अतिदक्षता विभागात स्फोट
Ahmedngar | Shirdi News: रुग्ण स्वत: पळाले बाहेर , सुदैवाने जीवितहानी नाही. (Explosion)
शिर्डी: साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सी. आर. यू. युनिटमध्ये अचानकपणे यूपीएसचा स्फोट झाला असून, युनिट कक्षातील उपचार घेत असलेले रुग्ण सुदैवाने बचावले आहेत.
रविवार, दि. २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील सी.आर. यू. (१) या युनिटमध्ये अचानकपणे यूपीएसचा स्फोट झाला. यावेळी या कक्षात उपचार घेत असलेल्या हृदयविकार शस्त्रक्रियासंबंधित बायपास, अँजिओप्लास्टी आदी एकोणावीस रुग्ण उपचारार्थ दाखल होते. स्फोटाच्या आवाजाने काही रुग्णांनी जीव वाचवण्यासाठी स्वत:हून बाहेर पळ काढला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालय प्रशासनाने तातडीने या सर्व एकोणावीस रुग्णांना दुसऱ्या कक्षात हलवून त्यांच्यावर सुरू असलेले उपचार सुरू केले. बॅटरी ओव्हरचार्ज झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर दोन दिवसांनी संस्थान विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, विश्वस्त सचिन कोते, विश्वस्त सुमित शेळके यांनी सांगितले. यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपसंचालक डॉ. प्रीतम वाडगावे, बांधकाम विभागाचे संजय जोरी, गायकवाड, विद्युत विभागाचे अधिकारी, तसेच यासंदर्भातील विभागाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आल्याचे डॉ. एकनाथ गोंदकर
ओव्हरचार्ज होऊन स्फोट झालेले यूपीएस तेथून काढून त्याठिकाणी दुसरे यूपीएस बसविण्यात आले आहे. मात्र, सदरची यंत्रणा या सी. आर. यू. (१) या कक्षातून तत्काळ हलविण्यात यावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.
श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घटना घडल्यानंतर मेडिकल टीमने तातडीने तेथील रुग्ण हलविल्याने कोणतीही हानी झाली नाही. तांत्रिक बिघाड झाल्याने सदरची घटना घडली. मात्र, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. याची दक्षता घेण्यात आली आहे. – भाग्यश्री बानायत मुख्य कार्यकारी अधिकारी साईसंस्थान, शिर्डी
Web Title: Explosion in Intensive Care Unit of Sai Sansthan Hospital