Home अहमदनगर ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाध्याक्षांवर खंडणीचा गुन्हा  

ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाध्याक्षांवर खंडणीचा गुन्हा  

Shrigonda:  तालुक्यातील घटना; खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

Extortion case against Shiv Sena taluka head

अहमदनगर:  श्रीगोंदा शहरातील फटाके व्यावसायिक दिवाळीच्या तोंडावर फटाका दुकान लावत असतात. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्षा बाळासाहेब दूतारे हे या फटका व्यावसायिकांच्या तक्रार करत होते.

तुम्हाला सगळ्यांना जर व्यवसाय करायचा असतील तर मला एक लाख रुपये द्या अशी मागणी केल्याने दूतारे यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिसांत खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील फटाका व्यावसायिक मंगेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा शहरातील फटाका विक्रेते मागील काही वर्षे दिवाळीच्या वेळेस बाजार तळ वरील राम मंदिराच्या समोर फटाके दुकान लावत असतात. यासाठी परवानगी घेत असतात. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दूतारे यांनी या फटाका विक्रेते यांच्याकडे, व्यवसाय करायचे असेल तर एक लाख रूपये देण्याची मागणी केली.

Web Title: Extortion case against Shiv Sena taluka head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here