Home क्राईम डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी टाकलेल्या छापांमध्ये (Raid) 45 लाखांचा तब्बल 650 किलो ओल्या गांज्याची झाड जप्त (seized).

farmer cultivated cannabis in the mountain ranges 45 lakhs worth of goods seized

नंदुरबार:  नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिसांनी एक धक्कादायक कारवाई केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो ओल्या गांज्याची झाड जप्त करण्यात आली आहेत.

धडगाव तालुक्यातील निगडीचा कुंद्यापाडा शिवारात गांजाच्या शेतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका व्यक्तीने आंब्याच्या वनराई जवळ गांजाची बेकायदेशीर लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी येथे धाड टाकली.

पोलिसांची धाड पडल्यानंतर संबंधित आरोपी तिथून पळ काढत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता हिरवट रंगाची 648 किलो वजनाचे एकूण 479 गांजाची झाडे आढळून आली. आरोपी रूपजा सिंगा पाडवी यांच्यावर कारवाई केली असून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: farmer cultivated cannabis in the mountain ranges 45 lakhs worth of goods seized

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here