Home अकोले अकोलेत राजकीय वातावरण तापले: शेतकरी नेते दशरथ सावंत पोलिसांच्या ताब्यात

अकोलेत राजकीय वातावरण तापले: शेतकरी नेते दशरथ सावंत पोलिसांच्या ताब्यात

Ajit Pawar in Akole: अजित पवार हे गायकर यांच्या  पॅनलच्या प्रचाराला अकोल्यात आले आहेत, शब्द दिला होता त्याचा खुलासा करावा. 

Farmer leader Dashrath Sawant in police custody

अकोले: अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल विचारणार इशारा शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सभे अगोदरच सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मी अजित पवार (Ajit Pawar) यांना सभेच्या व्यासपिठावर शांततेच्या मार्गाने जाऊन भेटणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी मी त्यांना भेटलो होतो तेव्हा अजित पवार यांनी मला मााघार घ्यावी म्हणून विनंती केली होती. ती विनंती मान्य करताना मी पवार यांना गायकरांना तुम्ही आता पवित्र करुन घेताय पण अगस्ति कारखाना निवडणूकीवेळी तुमच्या पॅनलचे गायकर नेतृत्व तर नाहीच पण ते उमेदवार सुध्दा असता कामा नये अशी अट सावंत यांनी त्यांना घातली होती. तेव्हा त्यांनी कारखाना निवडणूकीवेळी एकत्र बसून निर्णय करु असे अजितदादांनी सांगितले.

तर अजितदादांनी मी जिल्हा बँकेच्या वेळी माघार का घेतली? हे आजच्या सभेत सांगावे तसेच विधानसभा निवडणूकीच्यावेळी अकोलेकरांना जो शब्द दिला होता. 21 ला मतदान करा, 21 नंतर मी …फेडतो, असे म्हटले होते त्याचे काय झाले? ते तर राहिले बाजुला पण अजित पवार हे त्यांच्या पॅनलच्या प्रचाराला अकोल्यात आले आहेत, याचा खुलासा करावा यासाठी त्यांना मी भेटणार आहे असे श्री सावंत यांनी यापूर्वी जाहीर केले होते.

दरम्यान शेतकरी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली.  अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते.

Web Title: Farmer leader Dashrath Sawant in police custody Ajit Pawar meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here