Home अकोले अकोलेतील घटना: टेम्पोच्या धडकेत शेतकरी ठार

अकोलेतील घटना: टेम्पोच्या धडकेत शेतकरी ठार

Ahmednagar | Akole Accident: देवठाण रोडवरील सदाफुले हॉस्पिटल समोर टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना.

farmer was killed in a collision with a tempo Accident

अकोले : शहरातील महात्मा फुले चौकात देवठाण रोडवरील सदाफुले हॉस्पिटल समोर टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

तालुक्यातील सुगाव खुर्द येथील प्रतिष्ठित शेतकरी संपत बालाजी वैद्य (वय ६२) हे देवठाण रस्त्याने कारखाना रोडकडे येत असताना खत वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्रमांक एमएच १४ इएम ५७२९ ने त्यांना पाठीमागून धडक दिली, त्यात संपत वैद्य रस्त्यावर पडले व गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नुकतेच ते तिर्थयात्रा करुन आले होते. तिर्थयात्रे दरम्यान रामेश्वरम येथे समुद्रात बुडणारऱ्या दोन मुलींना त्यांनी वाचवून जीवदान दिले. मात्र अपघातात संपत वैद्य यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुगाव खुर्दचे माजी सरपंच महेश वैद्य व प्रगतीशील शेतकरी तुकाराम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

श्रीगोंदा | Shrigonda : लोणी व्यंकनाथ व श्रीगोंदा शहरात मोटारसायकलचे दोन अपघात झाले आणि दोन जण जागीच ठार झाले. हे अपघात गुरुवारी (दि. २६) झाले. नगर-दौंड रस्त्यावर लोणी व्यंकनाथ शिवारातील खराब रस्त्यावर सकाळी ११ च्या सुमारास मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये हरिश्चंद्र कुमार नलगे (वय ३५) हे जागीच ठार झाले. हरिश्चंद्र नलगे हे खराब रस्त्याचे बळी घडली. ठरल्याने अरुणराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलन केले. मांडवगण रस्त्यावर झालेल्या अपघातात शंभू गोरख वाघ (वय १९) हा तरुण जागीच ठार झाला.

Web Title: farmer was killed in a collision with a tempo Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here