Home अहमदनगर शेतकर्‍यांचे सातबारा उतारे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच: महसूलमंत्री थोरात

शेतकर्‍यांचे सातबारा उतारे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच: महसूलमंत्री थोरात

armers free access to their Satbara in their homes

अहमदनगर : ऑक्टोबर महिन्यात तुमच्या शेतकर्‍यांचे सातबारा (satbara) उतारे हे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच करणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 

ना. थोरात म्हणाले, सातबारा ऑनलाईन असले पाहिजे म्हणून मी मागील काळात 90 टक्के काम पूर्ण केले. आता हा सातबारा नव्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. त्यातील साफसफाई करण्यात आल्या आहेत. कोणी कर्ज पूर्णपणे भरलेले असेल आणि त्याचा बोजा सातराबावर कायम राहत होता मात्र आता तो सातबारा कोरा करता येणार आहे. आता शेतकर्‍याला आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. पीक पाहणीचा अ‍ॅप्स डाऊनलोड करून आपल्या शेतात बसून प्रत्येक शेतकर्‍याला वर्गवारीनुसार करता येणार आहे. या सप्टेंबर महिन्यात तुमच्या शेतकर्‍यांचे सातबारा उतारे हे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच करणार आहोत.

महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत ७/१२ नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून या सुधारित ७/१२ उताऱ्याची पहिली प्रत मोफत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे.

नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा खाते उतारा थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन हा नव्या स्वरूपातील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत.

याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत ७/१२, ऑनलाइन फेरफार, जलदगतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाने ७/१२ उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले असून ७/१२ उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हा नव्या स्वरुपातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खातेउताराचीही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे.

महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

Web Title: farmers free access to their Satbara in their homes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here