Home अकोले अकोले: खा. सुळे यांच्या सभेत शेतकर्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोले: खा. सुळे यांच्या सभेत शेतकर्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोले: खा. सुळे यांच्या सभेत शेतकर्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोले: तालुक्यातील अगस्ती कारखान्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करीत एका शेतकर्याने राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी अकोले शहरातील अगस्ती मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खा. सुळे यांचे भाषण सुरु असताना अगस्ती कारखान्याच्या उभारणीत शेतजमीन जावूनहि मोबादला न मिळाल्याचा आरोप करीत शेतकरी दत्तात्रय शेंकर यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकाने व काही कार्यकर्त्याने शेणकर यांना बाजूला ढकलत नेऊन पेटवून घेण्यापासून रोखले.

याप्रकरणी अगस्ती कारखाना निर्मितीत गेलेल्या जमिनीचा मोबादला मिळविण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब न करता सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः च्या अंगावर रॉकेल ओतून गोंधळ केल्याप्रकरणी अकोले येथील दत्तात्रय नामदेव शेणकर यांच्या विरुद्ध पोलिसांनी कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे, याबाबत पोलीस नाईक भारत गांजवे यांनी फिर्याद दिली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here