Home अहमदनगर सासरे भानुदास मुरकुटे व सुनबाईत रंगली ‘जुगलबंदी’ ! बनला चर्चेचा विषय

सासरे भानुदास मुरकुटे व सुनबाईत रंगली ‘जुगलबंदी’ ! बनला चर्चेचा विषय

Ahmednagar News: अशोक सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात चांगलीच ‘जुगलबंदी’.

Father-in-law Bhanudas Murkute and Sunbai played 'Jugalbandi'

श्रीरामपूर:  अशोक सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात काल सासरे अशोक कारखान्याचे अध्यक्ष, माजी आ. भानुदास मुरकुटे व सूनबाई माजी सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यामध्ये चांगलीच ‘जुगलबंदी’ रंगलेली पाहायला मिळाली.

निमित्त होते अशोक कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे. या सभेत अहवालावर बोलताना सौ. वंदना मुरकुटे म्हणाल्या कारखान्याच्या सन 2022-23 च्या अहवालानुसार 37,987 साखरेच्या पोत्याचा फरक दिसतो. म्हणजेच केंद्र शासनाच्या भावाप्रमाणे साडेअकरा कोटींचा फरक पडलेला आहे. तसेच कारखान्यावर मागील वर्षी सुमारे 115 कोटीचे कर्ज वाढले आहे. मागील वर्षी डिस्टलरी प्लँट चालू करण्यासाठी कारखान्याचे कर्ज घेतल होत, परंतू प्लँट चालू झाला नाही. घेतलेल्या कर्जचे व्याज कारखान्याला भरावे लागणार आहे. यासह अहवालातील अनेक त्रृटी डॉ. वंदना मुरकुटे यांनी उपस्थित सभासदांसमोर मांडल्या.

अशोक कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने त्याला उत्तर देताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, ज्याला पिठाची गिरणी चालविण्याचा अनुभव नाही. त्यांनी मला कारखाना कसा चालवायचा हे शिकवू नये. आम्ही बाप आहोत आम्हाला माहित आहे तुम्हाला कुणी बोलायला सांगितले. ज्यांनी तुमचं वाटोळं केलं आहे, त्यांचेच बोट तुम्ही धरता. गेली पस्तीस वर्षापासून येथील सभासद कारखान्याची धुरा आमच्या हातामध्ये देतात.तसेच पंधरा वर्षे आमदारकीही त्यांनी मला दिली आहे. हा त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. त्यामुळे कुणी काहीही शिकवले तरी सभासद त्याला बळी पडणार नाही.

दररोजच्या बातम्या  मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज

सासरे भानुदास मुरकुटे व सून डॉ. वंदना मुरकुटे यांच्यात हजारो सभासदांसमोर रंगलेली ही ‘जुगलबंदी’ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Father-in-law Bhanudas Murkute and Sunbai played ‘Jugalbandi’

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here