Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पित्याचा मुलाने केला खून, मुलगा अटकेत, या कारणामुळे मुलगा ..

अहमदनगर ब्रेकिंग: पित्याचा मुलाने केला खून, मुलगा अटकेत, या कारणामुळे मुलगा ..

Ahmednagar Murder Case: दारू पिलेल्या पित्याचा मुलाने केला खून मुलगा अटकेत,  जवळके येथील घटना.

Father Murder by son, son arrested

शिर्डी : दारू पिऊन मुलाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या बापाचा मुलाने लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ही घटना घडली. सखाहरी चंदू थोरात (वय ८०) असे मयताचे नाव आहे.

थोरात हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आले. त्यांनी त्याचा मुलगा सुरेश सखाहरी थोरात (वय ४८) याला शिवीगाळ करत दांड्याने मारहाण केली. याचा राग आल्याने मुलगा सुरेश थोरात याने वडील सखाहरी थोरात यांना लाकडी दांड्याने डोक्यात, हाता-पायावर बेदम मारहाण केली. त्यात वडील सखाहरी यांचा मत्यू झाला.

मुलगा सुरेश याने तशी कबुली दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सुरेश सखाहरी थोरात याच्यावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुरेश थोरात याला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Father Murder by son, son arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here