Home क्राईम सावकारी जाचाला कंटाळून घेतले पेटवून; इसमाचा मृत्यू

सावकारी जाचाला कंटाळून घेतले पेटवून; इसमाचा मृत्यू

Beed Crime: तुझ्या घराची रजिस्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून तगादा लावून धमकी दिली. या तिघांच्याही त्रासाला कंटाळून त्याने चार चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले.

Fed up with moneylenders, set on fire Death of person

केज | बीड:  सावकाराच्या जाचास कंटाळून इसमाने चार चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना केज येथे सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती.  पेटवून घेतलेल्या श्याम काळे याचा सोमवारी रात्री ११ वाजता अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेले श्याम काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात वर्षांपासून २० प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होते. २४ जानेवारी रोजी दादा मुंडे, सचिन सलगर व विजय जावळे यांच्याकडून त्याने १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते.

सोमवारी सकाळी तिघा आरोपींनी त्याला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून केजला शिक्षक कॉलनी भागात आणून नोटरीवर भागत नाही. तुझ्या घराची रजिस्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून तगादा लावून धमकी दिली. या तिघांच्याही त्रासाला कंटाळून त्याने चार चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले.

Web Title: Fed up with moneylenders, set on fire Death of person

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here