Home क्राईम शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक: संगमनेरचा कांदा व्यापारीविरोधात अकोले न्यायालयाने केले अटक वारंट जारी

शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक: संगमनेरचा कांदा व्यापारीविरोधात अकोले न्यायालयाने केले अटक वारंट जारी

Financial Fraud Akole court issues arrest warrant against Sangamner onion trader

Akole| अकोले: संगमनेरचा कांदा व्यापारी मोबिन इस्माईल शेख व त्याची पत्नी यांनी  शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणूक (Financial Fraud) बाबद अकोले न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहेत.

संगमनेर मधील मोमीनपुरा व कुरणरोड येथील कांदा व्यापारी मुबीन इस्माईल शेख याने रॉयल ट्रेडिंग कंपनी च्या नावाने कळस बु येथील शेतकऱ्यांन कडून कांदा खरेदी केला. जून, जुलै २०१९ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांदा दिला. सुरवातीला रोख पैसे दिले त्यामुळे त्यांचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे नंतर धनादेश देण्यास सुरुवात केली. अनेक शेतकऱ्यांनी कांदा दिला. त्यानंतर महिना पंधरा दिवसांत धनादेश टाका असे गोड बोलून तुमचे पैसे मिळतील असा खोटा विश्वास दिला. मात्र शेतकरी यांनी बँकेत हा धनादेश वाटवण्यास गेले असता त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने ते परत आले. असे दोन तीन वेळा झाले. खात्यात पैसे नसताना मुद्दाम धनादेश दिले. व ते वाटण्याची खोटी हमी देऊन या शेतकऱ्यांनची फसवणूक केली. तसेच भारतीय चलनक्षम कायद्याच्या तरतुदी चा भंग केला आहे. त्यानंतर वकिलाच्या मार्फत नोटीस देऊन ही त्याने पैसे दिले नाही त्यामुळे आरोपी ने  शेतकऱ्यांनची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले आहे. तसेच चलनक्षम कायद्याचा भंग हा फौजदारी गुन्हा केला आहे. भारतीय चलनक्षम कायदा कलम 138 अनव्ये अकोले न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी मोबिन शेख याने अनेक शेतकऱ्यांनची फसवणूक केली असून कळस बु येथील सखुबाई पुंजा वाकचौरे, जिजाबा जीवबा वाकचौरे यांनी अँड डी एम गवांदे तर रवी अशोक बिबवे यांनी अँड बी जी वैद्य यांचे मार्फत अकोले न्यायालयात फिर्याद 2019 ला दाखल केली आहे.

आरोपी मोबिन शेख याने कोर्टात जामीन दिल्यानंतर पुन्हा एकही तारखेला हजर राहिला नाही. यामुळे अकोले न्यायालयाने मोबिन शेख व त्याला जामीन असणारी त्याची पत्नी सलमा मोबिन शेख व मॅनेजर सचिदानंद काकड यांना अटक वारंट जारी केले असून संगमनेर शहर पोलीस स्टेशन चे पी आय यांच्या मार्फत याची बजावणी होणार आहे. यापूर्वी ही दोन वेळा त्याने पोलिसांना हुलकावणी दिली असून पत्नी व तो एकत्र राहत असताना पत्नी कुरण रोड च्या फिरदोस पार्क च्या पत्त्यावर मिळून येते मात्र तो सापडत नसल्याने कोर्टाने त्याच्या पत्नीला अटक वारंट काढले आहे.

“शेती माल बांधावर खरेदी करून व्यापारी हे शेतकऱ्यांनची फसवणूक करीत आहे. मोबिन शेख याने अनेकांचे पैसे बुडवले आहे. तो नाव बदलून मोबिन चौधरी नावाने पुन्हा फसवणूक करतो आहे. मात्र शेतकरी पुढे येत नाही. ज्या शेतकरी यांचे पैसे आहेत त्यांनी पुरावे सहित संपर्क साधावा. त्याचे वरती फौजदारी गुन्हा दाखल करायचे आहे. श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील, कळस बु ता.अकोले

Web Title: Financial Fraud Akole court issues arrest warrant against Sangamner onion trader

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here