अहमदनगर जिल्ह्यात या परिसरात रात्रीच्या वेळी दिसले आगीचे गोळे
Ahmednagar | पुणतांबा | Puntamba: विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह पुणतांबा परिसरात शनिवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान अवकाशात पश्चिमेकडून- पूर्वेकडे चार ते पाच आगीचे (Fire ball) गोळे चमकतांना नागरिकांनी अनुभवले.
अवकाशामध्ये एकामागोमाग एक असे 4-5 अगीचे गोळे चमकतांना अवकाशात दिसले. काही नागरिकांनी हे मनमोहक दृष्य आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केले. खगोल शास्त्रानुसार एक तर हा उल्कापात झालेला असावा किंवा काही उपग्रहामधील असणारा कचरा पृथ्वीच्या ऑक्सिजनच्या थराच्या संपर्कात आल्यास कचरा पेट घेतो त्याचे हे चमकदार आगीचे गोळे असावे किंवा एखाद्या उपग्रहाचे तुटलेले अवशेष असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काहींनी हे मनमोहक दृष्य सोशल मीडियावर शेअर केले. नागरिकांमध्ये हा उत्सुकतेचा विषय बनलेला होता. याबाबत रात्री व सकाळी गावात ठिकठिकाणी चर्चा सुरु होती. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही गावानजीकच्या लाडबोरी येथे आकाशातून विशालकाय रिंग पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Web Title: Fire balls were seen at night in this area in Ahmednagar