Home नांदेड भरदिवसा तरुणावर गोळीबार, या घटनेमुळे परिसरात खळबळ

भरदिवसा तरुणावर गोळीबार, या घटनेमुळे परिसरात खळबळ

Nanded Fired: दुचाकीवरून आला आणि तरुणावर गोळीबार केला, तरुणाच्या दंडातून आरपार.

Fired at youth in broad daylight

नांदेड: दिवसाढवळ्या नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली.  जुन्या वादातून शुक्रवारी ही घटना घडल्याचे माहिती मिळत आहे. जुना मोंढा भागातील खंडेलवाल स्वीट मार्टसमोर उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळी झाडल्यानंतर आरोपी बाप आणि अल्पवयीन मुलगा आपणहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सचिन कुलथे, रा. गाडीपुरा हा तरुण खंडेलवाल स्वीट मार्टसमोर उभा असताना दुचाकीवरून आलेला गजानन बालाजी मामीलवाड याने त्याच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे याच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे तो जागेवर कोसळला. या वेळी आरोपी मामीलवाड याने सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले होते. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात खळबळ उडाली होती.

Web Title: Fired at youth in broad daylight

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here