Home क्राईम प्रेम प्रकरणातून मुलीवर गोळीबार; मुलीसह प्रियकराचा मृत्यू- Firing

प्रेम प्रकरणातून मुलीवर गोळीबार; मुलीसह प्रियकराचा मृत्यू- Firing

Firing: प्रेयसीवर गोळी झाडल्याने तिचा मृत्यू. त्यानंतर प्रियकराचा अपघातात मृत्यू.

firing Girl shot over love affair Death of lover 

बोईसर : पालघर तालुक्यात बोईसर खैरापाडा येथील टीमा रुग्णालयाजवळ प्रेम प्रकरणातून झालेल्या गोळीबारात एका 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून गोळीबारानंतर पळण्याच्या नादात अपघात होऊन तरुणाचा देखील मृत्यू झाल्याची घडली असून या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या जुगल जोडीने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले. असेच प्रकार सुरु असताना प्रियंकाने गावठी कट्ट्ट्यातून प्रेयसीवर मागून गोळी धाडली. टीमा रुग्णालया बाहेर झालेल्या गोळीबारात नेहा मेहतो या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करून पळून जात असलेला आरोपी कृष्णा यादव हा एका गाडीला धडकून जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, बोईसर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम व पोलीस कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे.

Web Title: firing Girl shot over love affair Death of lover 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here