Firing: भावांच्या कौटुंबिक वादातून मद्याच्या नशेत बेधुंद झालेल्या एकाने छऱ्याच्या बंदुकीतून डोक्यात गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
नाशिकरोड : भावांच्या कौटुंबिक वादातून मद्याच्या नशेत बेधुंद झालेल्या एकाने छऱ्याच्या बंदुकीतून डोक्यात गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
यामध्ये तो किरकोळ जखमी झाला असून अमोल पंडित कुमावत (४०, रा. नांदूर नाका) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल आणि त्याचा भाऊ यांचा कौटुंबिक वाद आहे. नांदूर नाका येथील अमोल हा नाशिकरोड बिटको महाविद्यालय मागील जगताप मळा येथील आपल्या भावाकडे दारू पिऊन आला. दोघा भावांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. याचा राग आल्याने अमोल याने आपल्या जवळ असलेल्या छऱ्याच्या पिस्तूलमधून स्वतःच्या कानशिलावर गोळी झाडून घेतली. भाऊ आणि घरची मंडळी घाबरून त्याला धरू लागली. मात्र अमोल ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहून त्याचा मेव्हणा अतिष बेलदार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
ओरडत सुटला अन् धावत्या ट्रकखाली जीव दिला..!
नाशिकरोड: ‘मला आत्महत्या करायची आहे… असे जोरजोराने ओरडत महामार्गाच्या दिशेने धावत सुटलेल्या युवकाला जागरूक नागरिकांनी रोखण्याचा प्रयत्नसुद्धा केला; मात्र त्याने त्यांच्या हाताला हिसका देत स्वतःला एका भरधाव जाणाऱ्या ट्रकपुढे झोकून दिले. ट्रकच्या डाव्या बाजूला पाठीमागील चाकांखाली सापडल्याने तिशीतला युवक जागीच चिरडला गेला. या हृदयद्रावक घटनेने सारेच हादरले. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने युवकाची ओळख पटू शकलेली नाही.
रेल्वेपुढे आत्महत्या केल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते; मात्र धावत्या ट्रकखाली आत्महत्या केल्याची घटना
नाशिक शहरात नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा यापूर्वी कधी घडल्याचे ऐकिवात नाही.
पुणे महामार्गावर उपनगरजवळ बुधवारी (दि.२०) सकाळी ११ वाजच्या सुमारास एक अंदाजे तीशीतला युवक ‘मला आत्महत्या करायची आहे…… असे जोरजोराने ओरडत धावत सुटला होता. महामार्गालगत असलेल्या बिटको महाविद्यालयाजवळच्या चहाच्या टपरीवर थांबलेल्या लोकांनी त्याला धरले आणि महामार्गाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते; मात्र या युवकाने कोणाचेही ऐकले नाही आणि जे लोक त्याला धरून ठेवत होते त्यांच्या हाताला जोराने हिसका देऊन द्वारकेकडून भरधाव जाणाऱ्या अवजड ट्रकखाली (टी. एन५२ एच८९१९) झेप घेऊन स्वतःला झोकून दिले. ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्यामुळे या युवकाचा जागीच चेंदामेंदा झाला आहे.
Web Title: Firing Shot himself with a pellet gun
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App