Home नाशिक आधी दारू पाजली, मग सर्पदंश दिला; प्रॉपर्टीसाठी बायकोनं रचला नवऱ्याच्या हत्येचा कट

आधी दारू पाजली, मग सर्पदंश दिला; प्रॉपर्टीसाठी बायकोनं रचला नवऱ्याच्या हत्येचा कट

Breaking News | Nashik Crime:  नवऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी जीवे ठार मारण्याचा कट.

First drunk, then given snakebite Wife hatches conspiracy to kill husband for property

नाशिक:  नाशिकमध्ये नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी बायकोच त्याच्या जिवावर उठली. या साठी तिने कट रचला. आधी नवऱ्याला दारू पाजली आणि नंतर त्याला सर्पदंश देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदैवाने बायकोच्या या कटामधून नवरा वाचला आहे.  नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे.

सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचे नाव आहे, तर विशाल पाटील असे पीडित नवऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  विशाल पाटीलच्या संपत्तीवर पत्नी सोनी हीचा डोळा होता. या मात्र, पती तिच्या नावावर संपत्ति करत नव्हता. यामुळे तिने त्याला ठार मारण्याची योजना बनवली. या साठी तिने तिच्या दोघा साथीदारांची मदत घेतली. सोनी हिने आधी विशालला गोडी गुलाबीत बियर पाजली. त्याला नशा चढल्यावर त्याला सर्पदंश केला.

मात्र, त्याचा काही परिणाम झाला नसल्याने तिने त्याचा गळा आवळला. एवढेच नाही तर दोन साथीदारांच्या मदतीनं पतीचं तोंड उशिने दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातूनही त्याचा जीव वाचला. पत्नीच्या तावडीतून वाचलेल्या या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: First drunk, then given snakebite Wife hatches conspiracy to kill husband for property

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here