Home संगमनेर नगर जिल्ह्यातील कृषी कायद्यास समर्थन करणारी संगमनेर तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत

नगर जिल्ह्यातील कृषी कायद्यास समर्थन करणारी संगमनेर तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत

first Gram Panchayat in Sangamner taluka to support agriculture law

संगमनेर | Sangamner: केंद्रसरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यास ग्रामपंचायत सभेत मंजूर करणारी संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायत नगर जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास मंजुरी दिली आहे. निमोण ग्रामपंचायतची नुकतीच प्रभारी सरपंच दगडू मुरलीधर घुगे या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. या सभेत ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी कृषी कायद्यास समर्थन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर सभेत चर्चा  व विचारविनिमय करण्यात आला. केंद्र सरकारने सादर केलेले कृषी विधेयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत यावर सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी या ठरावाची सूचना मांडली तर त्यास मुश्ताक सुभेदार यांनी अनुमोदन दिले. नगर जिल्ह्यात कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.  

Web Title: first Gram Panchayat in Sangamner taluka to support agriculture law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here