Home बीड धक्कादायक घटना: पाच मामांनी एकत्रित येत भाच्याची दगडाने ठेचून निर्घुण हत्या

धक्कादायक घटना: पाच मामांनी एकत्रित येत भाच्याची दगडाने ठेचून निर्घुण हत्या

Beed Crime: जमिनीच्या वादातून पाच मामांनी एकत्रित येत काठीने व दगडाने मारहाण करीत निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Five uncles came together and brutally killed the niece

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा मोंढा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. काठीने मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा निर्घुणपणे खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये खून करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मयत तरुणाचे मामा आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37 वर्ष, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. तर, राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड असे आरोपींचे नावं आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र कळसे हा अंबाजोगाई शहरातील पाटबंधारे विभागाच्या मांजरा कॉलनीमध्ये राहत होता. राजेंद्र कळसे आणि त्यांचे पाच मामा यांच्यामध्ये जागेवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता. याच जागेवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. याचाच राग मनात धरून पाचही मामांनी राजेंद्र कळस हा मोंढा परिसरात उभा असताना, त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली. या पाच मामांनी एकत्रित येऊन दगडाने ठेचून व काठ्यांनी मारहाण करून राजेंद्र यांचे डोके फोडले. याच मारहाणीत राजेंद्र जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

या प्रकरणी आशा कळसे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र कळसे याचे मामा माणिकराव लाड, लक्ष्मण लाड, भरत लाड, बजरंग लाड आणि शत्रुघ्न लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Five uncles came together and brutally killed the niece

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here