Home क्राईम धक्कादायक! माजी सरपंचाचा अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेवून बलात्कार

धक्कादायक! माजी सरपंचाचा अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेवून बलात्कार

Rape News:  बाहेर जेवायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.

Former sarpanch rape a minor girl by taking her to a lodge

पुणे: पुण्यातून अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नझिरकर हे पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच आहेत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ अस सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Former sarpanch rape a minor girl by taking her to a lodge

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here