Home अकोले अकोलेत कळसेश्वर मंदिरातील दागिने चोरणाऱ्या चार आरोपींना अटक, पोलीस कोठडी

अकोलेत कळसेश्वर मंदिरातील दागिने चोरणाऱ्या चार आरोपींना अटक, पोलीस कोठडी

Akole Theft: कळसमधील तीन आरोपींचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे तर एक धुमाळवाडी येथील आरोपी Arrested.

Four accused who stole ornaments from Kalseshwar temple arrested

अकोले: अकोले तालुक्यातील कळसेश्वर मंदिरातील मुकुट व दागिने चोरणारे आरोपींना जेरबंद करण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. यामध्ये कळसमधील तीन आरोपींचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे तर एक धुमाळवाडी येथील आरोपी आहे.

दिनांक 11.09.2022 रोजी रात्री 11.45 वाजण्याचे सुमारास अकोले तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कळस येथील कळसेश्वर मंदिरातील देवी देवतांचे सोन्याचे दागिने व चांदीचा मुकुट व मदिरांत झोपलेल्या भाविकाचा मोबाईल चोरीची घटना घडली होती. एकुण 1,98,300/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

विवेक बाळासाहेब वाकचौरे यांचे फिर्यादीवरुन अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 425/2022 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 घडलेला प्रकार हा गंभीर स्वरुपाचा व भाविकांच्या भावना तीव्र करणारा असल्याने सदर बाबत मा. पोलीस अधिक्षक अ.नगर यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ तीन तपास पथक तयार करुन अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला.

 मंदिरात मिळुन आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच गोपनिय बातमीच्या आधारे कळस गावातील अभिषेक मारुती गवांदे याने त्याचे साथीदारांसह  सदरची चोरी केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा कळस,सिन्नर,शिर्डी, संगमनेर येथे शोध घेवुन त्यास संगमनेर मधुन ताब्यात घेण्यात आले.

अभिषेक मारुती गवांदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडे गुन्ह्यांचे अनुशंगाने केलेल्या चौकशीत त्याने त्याचे साथीदार अनिकेत रामनाथ वाकचौरे, प्रकाश सुरेश लाड तिघे रा. कळस ता अकोले, शाम तुकाराम केंग रा धुमाळवाडी ता अकोले यांचे मदतीने सदरची चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर वरील सर्व आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पंरतु चोरीच्या मालाबाबत उपयुक्त माहिती देत नसल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात येवुन दिनांक 16.09.2022 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 20.09.2022 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

पोलीस कोठडीमध्ये असताना सदर आरोपी कडे चौकशी अंती पुढील प्रमाणे गुन्ह्यात चोरी झालेले सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल फोन व हत्यार पुढील प्रमाणे जप्त करण्यात आले आहे. कळसेश्वर मंदिरातुन चोरीस केलेले 1) सोन्याची नथ,2) सोन्याचे मणि मंगळसुत्र 3)सोन्याचे नेकलेस 4) चांदीचा मुकुट 5) फिर्यादी यांचा मोबाईल फोन 6) सदर गुन्हयात चोरी करीता वापरलेली मोटार सायकल,7)व आरोपींचे मोबाईल फोन व रुपये रोख रक्कम व चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकुण 1,98,300/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीत हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन त्यांचे कडुन अजुन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाल्याने नागरिकांना विशेषतः अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायतींना याव्दारे आवाहन करण्यात येते की, गावाचे सुरक्षेतीतच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाणी, चौकात, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन गावात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वयीत करुन घ्यावे. तसेच कुणीही संशयीत इसम दिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास खबर द्यावी असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक सो अ.नगर यांनी केले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे, महिला पोउपनिरी फराहनाज पटेल, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ महेश आहेर,सफौ शेख, पोना विठ्ठल शेरमाळे, पोना राम लहामगे, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ विजय खुळे, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ सुनिल गवारी, पोकॉ संदिप भोसले, होम.शार्दुल वऱ्हाडे तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोना फुरकान शेख यांनी केली असुन पुढील तपास हे पोलीस नाईक राम लहामगे हे करीत आहे.

Web Title: Four accused who stole ornaments from Kalseshwar temple arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here