Home बुलढाणा वीज पडून चौघांचा मृत्यू, चार जखमी – lightning strike

वीज पडून चौघांचा मृत्यू, चार जखमी – lightning strike

Four killed, four injured in lightning strike

बुलढाणा: गाव शिवारात पाउस सुरु असताना विदर्भातील दोन जिल्ह्यात वीज (lightning strike) पडून ४ जण ठार तर चार जखमी झाल्याच्या घटना गुरुवारी दुपारी घडल्या.

पळशी झांशी गाव शिवारात शुभम हेलगे यांच्या शेतात विहिरीचे क्रेनद्वारे खोदकाम सुरु होते. यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. पाउस सुरु असताना क्रेनवर काम करणारे संजय उत्तम मारोडे वय ५५ व रवी संजय भालतडक वय ३५ या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले.

गोंदियातील गोरेगाव येथे शेतात पेरणी करीत असताना वीज पडून जोशिराम झगडू उईके वय ४५ या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले.

अर्जुनी मोरगाव येथे घरामागे असलेल्या शेतात काम करीत असताना वीज पडल्याने सावरटोला येथील पवनकुमार मनोहर गुढेवार या २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.  

Web Title: Four killed, four injured in lightning strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here