Home गडचिरोली लग्न आटोपून घरी जाताना झाडाखाली थांबले,वीज कोसळली, अख्खं कुटुंब संपलं

लग्न आटोपून घरी जाताना झाडाखाली थांबले,वीज कोसळली, अख्खं कुटुंब संपलं

लग्नसमारंभाला जाऊन घरी परत येत असताना अंगावर वीज कोसळून  (lightning strikes) एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना.

Four members of the same family died due to lightning strikes

गडचिरोली: लग्नसमारंभाला जाऊन घरी परत येत असताना अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना २४ एप्रिल म्हणजेच आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भारत राजगडे, अंकिता भारत राजगडे (पत्नी),देवांशी भारत राजगडे (4वर्ष) मुलगी,लावण्या भारत राजगडे (2 वर्ष) मुलगी अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. लग्नावरुन येताना राजगडे कुटुंब झाडाखाली थांबलं नेमकं त्याच झाडावर वीज कोसळली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  भारत राजगडे हे वडसा तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी असून ते सहपरिवार दुचाकीवरुन कुरखेडा येथे लग्न समारंभाला गेले होते. लग्न समारंभ आटोपून सायंकाळच्या सुमारास कुरखेडा वरून वडसा तालुक्यातील आमगाव येथे परत येत होते. अचानक विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होत असल्याने वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी (तुळशी फाटा) जवळ झाडाखाली दुचाकी थांबवून विश्रांती घेत होते. अचानक वीज कोसळल्याने भारत राजगडेसह संपूर्ण परिवाराला यात जीव गमवावा लागला.

विशेष म्हणजे घटना घडल्या ठिकाणाहून आमगाव हे जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर होते. मात्र,काळाने घात घातला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. सध्या चौघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय वडसा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट व मेघगर्जना सुरू आहे. अशातच आज घडलेल्या घटनेत एकाच परिवारातील चार जणांचा जीव गेला आहे.

Web Title: Four members of the same family died due to lightning strikes

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here