Home चंद्रपूर धक्कादायक घटना: वीज कोसळून चार महिलांचा मृत्यू

धक्कादायक घटना: वीज कोसळून चार महिलांचा मृत्यू

Chandrapur: वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू (Died).

Four women died due to lightning

चंद्रपूर: जिल्ह्यात धक्कादायक काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी ही घडली आहे. शेतात काम करीत असताना वीज कोसळून शेतकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.  

हिरावती शालिक झाडे (४५), पार्वता रमेश झाडे (६०),मधुमती सुरेश झाडे(२०), रीना नामदेव गजभे वय (२०) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्ती होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात शेगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू झाल्याने परिसर शोकाकूल झाले आहे. आज दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना शेतकरी महिलांना मृत्यूनं गाठलं. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

Web Title: Four women died due to lightning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here