जिल्हा बँकेत बनावट सोने तारण प्रकरणी लाखोंची फसवणूक, २० जणांवर गुन्हा
राहुरी | Ahmednagar District Bank: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शाखेत बनावट सोने तारण ठेऊन २७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या २० खातेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मंगळवारी शाखाधिकारी भाऊसाहेब माधवराव वर्पे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
१ सप्टेंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० या कालावधीत आरोपींनी संगनमताने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तांभेरे येथील शाखेत वेळोवेळी सोने तारण कर्ज म्हणून रोख रक्कम घेतली. बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहे.
याप्रकरणी आरोपी प्रकाश पठारे, पूजा पठारे, सुनील सरोदे, राहुल पठारे, अनिल सरोदे, प्रवीण शिरतोडकर, राहुल नालकर, अरुण शिंदे, गोरक्ष जाधव, बाबासाहेब पठारे, रविंद पवार, अश्विन पवार, नवनाथ पठारे, पोपट थोरात, संदीप आनाप, शुभम येळे, माया येळे यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Fraud of lakhs in fake gold mortgage case in Ahmednagar district bank