बघून हसला म्हणून फळविक्रेत्यानं तरूणाचे दोन्ही हात छाटले, भयावह घटना
Nanded Crime: नांदेडमधून थरकाप उडविणारी घटना घडली आहे. एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले.
नांदेड : नांदेडमध्ये धक्कादायक व थरकाप उडवणारी घटना घडली आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी पसार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आले आणि लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण देखील हातगाड्यावर फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणातच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: fruit seller cut off both hands of the young man for laughing Crime Filed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App