Home संगमनेर Theft | संगमनेर तालुक्यात फर्निचर दुकान फोडले, लाखोंचा मुद्देमाल चोरीस

Theft | संगमनेर तालुक्यात फर्निचर दुकान फोडले, लाखोंचा मुद्देमाल चोरीस

Furniture shop theft in Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: सुकेवाडी शिवारातील भिंगारे फर्निचर मॉलचे दुकान अज्ञात इसमाने पत्रा कापून दुकानातील एक लाख ३३ हजारांचा मुद्देमाल चोरून (Theft) नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विष्णू यादव भिंगारे रा. इंदिरानगर संगमनेर यांच्या मालकीचे संगमनेर ते नगर रोड वर सुकेवाडी शिवारात भिंगारे फर्निचर मॉलचे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पत्रा कापून दुकानातील ४० हजार रुपयांचा एलजी कंपनीचा एलइडी टीव्ही, ५३ हजार रुपयांचा पीएचएकस कंपनीचा ३२ इंच टीव्ही असे वेगवेगळ्या कंपनीचे टीव्ही असा एकूण एक लाख ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत विष्णू भिंगारे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Furniture shop theft in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here