Home संगमनेर संगमनेर – गगनगिरी महाराज सप्ताहास प्रारंभ

संगमनेर – गगनगिरी महाराज सप्ताहास प्रारंभ

संगमनेर – गगनगिरी महाराज सप्ताहास प्रारंभ

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव डेपा येथे स्वामी गगनगिरी महाराजांचा अखंड हरी सप्ताहाचा ध्वजारोहण खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रमातील गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला तसेच घटस्थापना करण्यासाठी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी आबासाहेब थोरात, बावुसाहेब देशमुख, रणजीत देशमुख, पवार बाळासाहेब, संजय पुंड, सुनील खरे, प्रमोद देशमुख, किरण गोटेकर यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

साकुर फाटा येथून ढोल ताशा गजरांच्या आवाजात गगनगिरी महाराजांचा जयजयकार करत सुमारे सकाळी ११ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत आनंद्वाडीच्या ग्रामस्थांनी देवतळ्याहून आणलेल्या महाराजांच्या पादुका घेऊन मंडळी सहभागी झाल्या होत्या, तसेच मिरवणुकीत हत्ती, उंट, बैलगाडी, पुरुष भजनी मंडळ, गगनगिरी महाराजांचा रथ आदी आकर्षण होते.

ad Sangamner Akole News


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Kaala box office collection


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here