दरोड्याचा तयारीतील टोळी पोलिसांकडून जेरबंद
Breaking News | Ahmedngar: दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीवर लोणी पोलिसांनी झडप घालून तिघांना जेरबंद (Arrested) केले तर दोघे जण पळून गेले.
लोणी: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीवर लोणी पोलिसांनी झडप घालून तिघांना जेरबंद केले तर दोघे जण पळून गेले.
बाभळेश्वर-पिंपरी रस्त्यावर निळवंडे कॅनॉल पुलाजवळ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हातात लाकडी दांडके व धारदार चाकू घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर गस्तीवर असलेल्या लोणी पोलिसांनी झडप घालून तिघांना जेरबंद केले तर अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण पळून गेले. आरोपीमध्ये बाळू किसन गायकवाड, गणेशवाडी शिर्डी, अजित विजय कुऱ्हाडे,कोहाळे, विधी संघर्षग्रस्त बालक, कालिकानगर शिर्डी यांचा समावेश आहे तर योगेश कुन्हाडे, राहाता व एक अनोळखी इसम दुचाकीवरून पळून गेले. पोलिसांनी २ चाकू, १ लाकडी दांडा, मिरची पावडर, २५ फूट दोरी, ६ मोबाईल आणि एक दुचाकी आरोपींकडून हस्तगत केली. सपोनि युवराज आठरे, उपनिरीक्षक शिंदे, चौधरी व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. गु.र.नं. ख/९/२०२४ भादवि ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Gang preparing for robbery arrested by police
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News