Home अहमदनगर धक्कादायक: मुलीचे आत्महत्याचे भूत काढायला मांत्रिकाकडे गेली अन

धक्कादायक: मुलीचे आत्महत्याचे भूत काढायला मांत्रिकाकडे गेली अन

girl went to the witch to exorcise the ghost of suicide

अहमदनगर | Suicide: नगर शहरातील वैदुवाडी भागात एक 15 वर्षीय  मुलगी सतत फाशी घेऊन आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न करत असतं.  त्यामुळे लोकांच्या सांगण्यावरून तिची आई तिला एका मांत्रिकाकडे घेऊन गेली. त्याने तुमच्या मुलीच्या अंगात फाशी घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे भूत संचारले असल्याचे सांगितले. ते भूत बाहेर काढण्यासाठी होमहवन करावे लागेल या कारणासाठी ८ हजार रुपये आणि अन्य साहित्य घेतले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली. तोफखाना पोलिसांनी मांत्रिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या मांत्रिकाने होम हवन करून मुलीच्या अंगातील भूत काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले. होम हवन करण्यात आले. कोंबडी कापण्यात आली, मांत्रिकाने पैसेही घेतले. आता मुलीच्या अंगातील भूत नाहीसे झाल्याचे त्याने सांगितले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्यावर मुलीच्या आईने व मुलीने पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र आरोपींनी नकार दिला, उलट त्यांनाच मारहाण केली. त्यामुळे पंधरा वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक) व एक अनोळखी मांत्रिक पुरुष यांच्याविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: girl went to the witch to exorcise the ghost of suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here