आईसोबत रुग्णालयात गेलेल्या मुलीवर अत्याचार
Crime News: रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेत तिच्यासोबत अश्लील चाळे (assaulted) केल्याची धक्कादायक घटना.
मुंबई: आईसोबत सोनोग्राफीसाठी आलेल्या ९ वर्षांच्या मुलीला जे.जे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पॉक्सोचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
भायखळा येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय तक्रारदार ९ वर्षांच्या मुलीसोबत सोनोग्राफी विभागात आल्या. मुलीला विभागाबाहेर बसवून त्या नंबर लावण्यासाठी गेल्या. बाहेर येताच, मुलगी जागेवर न दिसल्याने त्यांना धक्का बसला. अनोळखी व्यक्तीने मुलीला एकटे पाहून तिला रुग्णालयातील मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील पुरुष शौचालयात नेले. तेथे अश्लील चाळे सुरू असताना मुलीने पळ काढला. आईची भेट होताच, तिने हंबरडा फोडला. आरोपी लैंगिक अत्याचार करणार, तोच मुलीने प्रसंगावधान दाखवत तेथून पळ काढला. महिला उभी असलेल्या ठिकाणी आरोपी वावरताना फुटेजमध्ये दिसत आहे. याबाबत तपास सुरू आहे.
Web Title: a girl who went to the hospital with her mother was assaulted
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App