Home महाराष्ट्र हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

Gang Rape Case: २० वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना.

girl working in a hotel was gang rape

पनवेल: शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशातच एक सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित तरुणीवर पुण्यात सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पनवेलमध्येही २० वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पनवेलच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हॉटेलमधील काम संपवून घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  खोपोली येथील एका हॉटेलमध्ये काम करणारी तरुणी २९ जानेवारीला पहाटेच्या सुमारास घरी जाण्यास निघाली होती. त्यावेळी पनवेलमधून करंजाळे येथे जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला दोन जणांनी रिक्षा हवी आहे का?, असं विचारलं. तरुणीनं होकार दिल्यानंतर आरोपींनी तिला एका रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आळीपाळीनं बलात्कार केला. याशिवाय याबाबतची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणीनं तातडीनं पोलीस ठाणे गाठत घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक करत काही तासांतच दोनपैकी एका आरोपीला अटक केली आहे.

पनवेलमधील या बलात्कार प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पनवेल रेल्वे स्टेशन आणि घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक केले जात आहे. याशिवाय पीडित तरुणीला ज्या रिक्षातून नेण्यात आलं होतं, त्या रिक्षाचाही शोध घेतला जात आहे. बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Web Title: girl working in a hotel was gang rape

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here