Home महाराष्ट्र Crime: प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावावर कटरने वार

Crime: प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावावर कटरने वार

girl's brother was stabbed in the cheek and try murder with a sharp cutter

पुणे | Pune Crime: चंदन नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तर्फी प्रेमातून माथेफिरू आरोपीने एका मुलीच्या भावावर धारदार कटरने गालावर व गळ्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा (Murder) प्रयत्न केल्याची धक्कदायक पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. सिराज मोईन शेख असं आरोपीचे नाव आहे. शिराज मोहईन शेख याने वडगाव शेरी परिसरात एका तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

शीराज मोईन शेखच्या इशार्याला घाबरून तरुणीने आपल्या घरात जाऊन घराचा दरवाजा लावुन घेतला. त्यांनतर शिराज मोईन शेखने फिर्यादी मुलीच्या घरात बळबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीच्या आजीने शिराज मोईन शेखला घरातून हाकलून लावलं. त्यांनतर रात्री १२ वाजता दरम्यान शिराज शेख पुन्हा तरुणीच्या घराजवळ येऊन थांब तुला आता जिवंत सोडणारा नाही अशी धमकी देऊ लागला.

यावेळी फिर्यादी आणि तिच्या भावाने पोलिसांना फोन लावला असताना शिराज शेखने फिर्यादी यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्याच्या जवळील धारदार कटरने फिर्यादी यांच्या गालावर व गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. या प्रकरणात आरोपी शिराज मोईन शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: girl’s brother was stabbed in the cheek and try murder with a sharp cutter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here